Wednesday, December 2, 2020

हरिश्चंद्र गड ट्रेक 2020

हरिश्चंद्र गड ट्रेक


28/29 नोव्हेंबर 2020

सह्याद्रीतील भटक्यांची पंढरी, सह्याद्रीचा मुकुट मनी अशी ना ना प्रकारची विशेषणे जर कोणासाठी वापरली जात असतील तर आम्हा भटक्यांच्या तोंडी एकाच नाव येतं ते म्हणजे हरिशचंद्रगड.
    हरिश्चंद्र गडाला भटक्यांची पंढरी का म्हणतात हे खर तर आपण तिथे भेट दिल्यावर कळत कारण प्रत्येक वेळी वेग वेगल दिसणार तीच सौदर्य पावसाळ्यात तर ते अजुन फुलून दिसत पृथ्वी वरील स्वर्ग जर  पहायचं असेल तर एकदा तरी पावसाळ्यात प्रत्येकाने भेट दिलीच पाहिजे आणि ह्या पंढरीचा मी एक वारकरी दर वर्षी निदान एकदा तरी  न चुकता भेट देणारा.गडाचा ,इथल्या मातीचा आणि सर्वात महत्वाचं इथल्या माणसाचा माझा  जिव्हाळ्याचा संबंध अगदी की माझं सह्याद्री तील दुसर घरच. इथल्या लोकांनी न मला कधी जात विचारली न धर्म अश्या खूप साऱ्या आठवणी ह्या मातीत जडल्या आहेत
खर तर माझा खऱ्या अर्थाने  जो ट्रेकिंग चा प्रवास चालू झाला तो ह्याच गडपासून आणि तो पण गडावर जाणारा सर्वात खडतर अश्या माळशेज घाटातील बेलपाडा गावातून जाणाऱ्या नळीच्या वाटेने अहो ती वाट कसली ती तर पावसाळ्यात गडावरून खाली वाहणाऱ्या पाण्याची छोटीशी नाळ ह्या वाटेने कठीण असे रॉक पॅच रोप च्या साह्याने चढून आठ तासांच्या खड्या चढाई नंतर गडावर पोहचलो आणि तिथून पाचनाई गावात आणि गावातून 3/4 km चालून परत सदाडे घाट चढून परत बेलपाडा गावात असा तब्बल 18 तसाच पहिलाच ट्रेक खूप सार शिकवून गेला.
     तश्या गडावर जाण्यासाठी खीरेश्र्वर,नळीची वाट, सदडे घाट,माकड नाळ आणि सर्व आबालवृद्धांना घेऊन जाणारी तितकीशी सोईस्कर अशी पाचणाई मार्गे  पाच्नाई  गावाला हे जे नाव पडलं ते इथे उगम पावणाऱ्या पाच उप नद्या मुळे.ह्या गावातून फक्त दोनच तासात आपण गडावर पोहच तो हरिश्चंद्रगड हा ठाणे ,पुणे,नगर, च्या सीमेवर आणि माळशेज घाटाच्या डावीकडे असणारा अजस्त्र असा डोंगर ह्या गडाला तसा महाराजांच्या लढाईचा जास्त इतिहास नसला तरी गडाला 2/3 हजार वर्षांपूर्वीची पौराणिक पार्श्वभूमी आहे आदिवासी कोळी महादेव समाजाच्या ताब्यात असणारा हा गड मोगलांनी ताब्यात घेतला पुढे तो मराठ्यांनी 1747-48 मध्ये मुगलांकडून ताब्यात घेतला.तसेच ह्या गडावर हरिश्चंद्र रोहिदास तारामती अशी शिखरे असल्या मुळे त्याचा संदर्भ थेट राजा हरिशचंद्र यांच्याशी देखील जोडला आहे जेव्हा राजाने कुबेरा कडून कर्ज घेतले होते ते फेडता न आल्याने राजा इथे वास्तव्यात होता असे गावकरी सांगतात त्याच प्रमाणे ह्या गडावरील मंदिराच्या मागील गुहेत चांगदेव महाराजांनी 1400 वर्ष तपश्चर्या केली आहे अस देखील सांगतात.
     गडावर सुमारे 12 व्या शतकापेक्षा जुने शालिवाहन काळातील हरिहरेश्वर च  शिवमंदिर  आहे तसेच प्राचीन लेणी आणि मंदिरा समोर  सुंदर अशी पुष्करणी देखील आहे.तसेच गुहेतील केदारेश्वर च मंदिर तर अदभुत च अस म्हणतात की सत्य युगात धर्म चार पायांवर उभा असतो त्रेता युगात 3 पायावर द्वार युगात 2 पायावर आणि कली युगात सध्या एका पायावर हे शिवलिंग पाहिल्यावर आपल्याला हे लक्षात येतं मूळचे चार खंबनी वेढले ल आज एकाच खांबावर उभ आहे.
मंदिराच्या मागील बाजूने एक वाट अजाष्र अशा  कोकण कड्याकडे जाते कोकण कड्याच वर्णन शब्दात व्यक्त न करण्यासारखे आहे.तुमचं नशिब जर चांगले असले तर तुम्हाला ढगांच्या गर्दीत स्वर्गात असल्याचा भास होतो. 
   असा हा सुंदर गड लॉक डाऊन नंतर करायचं  होताच त्यात कॉलनीतील माझ्या वहिनी मंडळी मागे लागलेल्या होत्या आम्हला पण घेऊन जा म्हणून डिसेंबर मध्ये तसा डोक्यात प्लॅन होताच  त्यातच एक दिवस आमचे ट्रेक मित्र चंदन सरांचा फोन आला 29 नोव्हेंबर हरिश्चद्रगड करू नंतर मीच माझा विचार मांडला जायचं तर फॅमिली ट्रेक करू त्यांनी पण लगेच होकार देऊन ग्रुप वर masage टाकला आणि आमच्या नेहमी चे ट्रेकर मित्र उमेश आणि 2 फॅमिली तयार झाल्या त्या प्रमाणे मी पण कॉलनीतील वाहिण्यांशी विचारून त्यांचे पण आश्वासन घेतले परंतु मला सारखी एक भीती होती ती ही की त्यातील आमचे एका वहिनीचा sleep disc चा प्रोब्लेम आणि एकीचा पायाचा त्या मुळे ह्यांना जर काही त्रास झाला ना माझ काही खर नवत पण मनातून एक अशा होती की निसर्गात गेलं की माणूस सगळ दुःख विसरून जातो त्याच आशेवर ट्रेक चा दिवस ऊजेडला आणि अगदी निघतानाच आमचा एक मित्र कॅन्सल झाला त्यामुळं माझी बहिण नुकतीच आलेली असल्याने आमच्या वहिनी नी तिला ऐनवेळेस  तयारी करायला लावली त्यामुळे निघण्यास नेहमी प्रमाणे माझ्या कडूनच एक तास उशीर होणारी ह्या वेळेस निघायला 2 तास उशीर झाला त्यात आमची बाकीचे मंडळी फोन करून कधी निघता अस विचारून हैराण करून सोडलं त्यांचं ते साहजिकच म्हणा कारण त्यांच्या बायका मुल सकाळी 5 वाजता उठून बसलेले नंतर त्यांना सर्वांना घेऊन आमचा ट्रेक चा प्रवास चालू झाला सर्वांच्या चेहऱ्यावर एक वेगळ्या प्रकारचं तेज होत कारण घर मुल आणि ऑफिस च्या गुर्फट्यात ट्रेक चा विचार करण म्हणजे स्वापणात पण न वाटणार सह्याद्री च सौदर्य सत्यात उतरताना त्यांना दिसत असेल.त्या मुळेच त्यातील बऱ्याच जनी शी एकमेकींशी ओळख नसताना देखील त्यांची मैत्री क्षणरधात तयार झाली.अश्याच गप्पा लहान मुलांचा धांगड दिंगा करत गाडीचे एक चाक पंचर झालं आणि गाडीने विश्रांती घेण्याचं ठरवल म्हणून तो पर्यंत आम्ही घरून आणलेला डब्ब्यावर  रोडच्या शेजारील ताव मारला जेवण वैगरे आवरून आम्ही पुन्हा पुढील प्रवासास लागले एव्हाना लहान मूल देखील वैतागली होती काका किती वेळ अजुन अस विचारत होती थोडाच राहील अस करता करता pachnai गाव जवळ अल आणि रस्त्यातच माझा सह्याद्रीतील भाऊ प्रकाश अजुन का आले नाही म्हणून गावा पासून एक किलोमीटर वर येऊन थांबला होता त्याला घेऊन आम्ही माझ्या सह्याद्रीतील घरी गेलो तिथे सर्व आवरा अवर करून आम्ही लगेच गडाची चढाई चालू केली आमचं नेहमी प्रमाणे चंदन सर पुढे राहतात आणि अगदी शेवटच्या माणसाला गडावर सुखरूप पोहाचावण्या ची जबाबदारी मी घेतो. येरवि गडावर पोहचण्यास दोन तास लागतात पण सर्वच पहिल्यांदाच येत असल्याने मी 3 तास लागतील अस गृहीत धरेले होत पण गप्पा गोष्टी करत सर्वांनीच गड अडीच तासातच पूर्ण केला अस वाटलच नाही की सर्व पहिल्यांदाच ट्रेक करताय.आम्ही सगळ्यात शेवटी असल्या मुळ आम्हाला सूर्यास्त बघता नाही आला पण आमच्या काही मंडळींना तो बघता आला.गडावर आमच्या प्रकाश आणि अनिता ताई ने सर्व तयारी करूनच ठेवली होती प्रकाश आणि मी टेंत लावू स्तावर अनिताने सुंदर असा ब्लॅक टी बनवला सर्वांनी दोन दोन कप पिऊन आपापल्या tent मध्ये आराम करुस्तावर  अनिता स्वयंपाकासाठी लागली होती तिला देखील थोडाफार हातभार आमचा वहिनींनी लावला.स्वयंपाक झाल्या नंतर सर्व आपापल्या tent मध्ये जाऊन झोपले कारण सोसाट्याच्या वाऱ्या मुळे शेकोटीच आनंद घेता येणार न्हवता.पण रात्र भर प्रचंड वाऱ्या मुळ कोणालाच पूर्ण झोप लागली नाही पण tent चा आनंद घेता आला हे महत्वाचं.सकाळी सर्व लवकर उठून चहा वैगरे घेऊन आम्ही कोकण कड्या कडे निघालो कोकण कड्याचं सौदर्य आणि अंगाला झोंबणारा गार वारा या मुळ सर्वानाच आपला फोटो काढण्याचा मोह आवरता आला नाही.आणि त्यातच मला देखील माझा गारद घेण्याचं मोह आवरला नाही.तिथून आम्ही नाश्ता घेऊन मंदिराचे दर्शन घेऊन गड उतरीला लागलो खाली गावात आल्यावर प्रकाश कडे मनसोक्त जेवणाचा आस्वाद घेऊन आम्ही त्याचा निरोप घेतला.

सर्वात शेवटी मझ एकाच सांगणं अस्त...

महाराष्ट्र च्या भूमीत जन्माला यावे आणि किल्ले शिखर पाहू नये, हे होवूच शकत नाही. प्रत्येकाने आपल्या आयुष्यात एकदातरी किमान दोन दिवसांचा वेळ काढून किल्ल्यावर जावून एका आगळ्यावेगळ्या नंदनवनात जावून येण्याचा अविस्मरणीय अनुभव घ्यावाच, नाहीतर आयुष्य व्यर्थच गेले असे समजा!!


सचिन भांड
sahyadritrekers.blogspot.com

फोटो पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा
https://drive.google.com/folderview?id=1EZrFFOXWQhipWrtfnF7RLF6m7bfq_KtZ


Tuesday, November 10, 2020

Kanchan water fall rappling

 कांचन  वॉटरफॉल rappling

 तब्बल नऊ महिन्यांचा प्रतिक्षे नंतर सह्याद्री ट्रेकर्स चा ट्रेकिंग चा श्री गणेशा झाला तो पण एक अविस्मरणीय ट्रेक ने तो म्हणजे दुर्गवडी येथील कांचन वॉटर फॉल rappling ने.

     कोरोना च्या महामारिने तब्बल ९ महिने घरात बसल्या नंतर सर्व उत्सुक होते कधी एकदाच बाहेर पडतो आणि ट्रेक ला निघतो अस झाल होत सर्वांना  तेव्हा ठरवल असा एक वेगळा ट्रेक करायचा जो कायम स्वरुपी स्मरणात राहील म्हणून आमचे मित्र सहयगिरी चे दीपक भाऊ यांच्याशी चर्चा केली त्यांनी जुन्नर तालुक्यातील अंबेहत्विज येथील धबधब्यावर rappling करायची कल्पना सुचवली पण आमच्यात मी सोडून कोणीही अजुन rappling केलेली नवती तरी देखील प्रत्येकाला हा अनुभव घेता यावं म्हणून ही कल्पना ग्रुप वर टाकली सुरवातीला दोघे सोडून कोणीच तयार नवते पण नंतर सर्वांना rappling विषयी थोड समजाऊन सांगितल्यावर त्यांची पण हिम्मत वाढली rappling ही प्रत्येकाला करावयशी वाटते पण केवळ भीती पोटी बऱ्याच जणांची ती इच्छाअपोरीच राहते.आणि बघता बघता १० मावळे तयार झाले आणि आता बऱ्याच दिवसांनी बाहेर पडतोय तर सह्याद्रीत campaign पण करायचं ठरवल दिवस ठरला ७/८ नोव्हेंबर चा आता तो दिवस उजेदला सर्व उत्सुक होते सकाळ पासूनच सर्वांचे फोन चालू झाले कधी निघायचं त्या प्रमाणे दुपारी ३ वाजता आम्ही सर्व अविस्मरणीय अनुभव घेण्यास निघालो रात्री ९ वाजता आम्ही आमच्या campaign च्या  ठिकाणीं म्हणजे अंबे हत्विज ह्या ठिकाणी पोहचलो अंबे हतविज हे ठिकाण म्हणजे जुन्नर तालुक्यातील स्वर्ग प्रचंड विस्तीर्ण कोकण कडा आणि डोंगरावर असलेलं दुर्गा देवी च मंदिर अतिशय सुंदर आहे तिथे पोहचल्यावर दीपक भाऊ आणि कुसुम ताई ने गरमा गरम भजी काढले ते काढून झाल्यावर सर्व जन त्यांना स्वयंपाक करण्यास मदत करत होते सुंदर अश्या जेवणाचा आस्वाद त्या नंतर गरमा गरम खीर आणि नंतर शेकोटी चा आस्वाद घेऊन आम्ही कोकण कड्यावर आमचे tent लावून झोपलो ते सकाळी जाग आली सुंदर अश्या पक्ष्यांच्या आवाजानेच काही लोक स्वर्ग काय अस्त याची नुसतीच कल्पनाच करत असतात पण आम्ही भटके तो स्वर्ग आमच्या उघड्या डोळ्याने सह्याद्रीत बघत असतो .असच अनुभव सकाळी उठल्यावर आम्हाला आला.आणि सर्व फोटो प्रेमींनी वेगवेगळ्या पोज मध्ये फोटो काढण्याचा मोह आवरता आला नाही.तेथील फोटो सेशन संपून आम्ही चहा आणि मॅगी चा नाष्टा करून दुर्गवडी येथील कांचन वॉटर फॉल इथे पोहचलो तिथे पोहचल्यावर दीपक ने संपूर्ण सेट अप लाऊन झाल्यावर बऱ्याच जणांची धक धक एव्हाना चालू झाली होती आपल्याला जमेल का नाही.नंतर दीपक ने rappling कस करायच याच मार्गदर्शन करून प्रथम तो खाली उतरला आणि त्या नंतर मी खाली उतरलो पण आता इथ माझी इच्छा अपूर्ण राहिली कारण खाली कोणी नवत  व्हिडिओ शूट करायला मी खाली आल्यावर दीपक भाऊ वरती गेले आणि खाली मी थांबलो support ला असे एक एक करून वरतून दीपक दादा आणि कुसुम ताई एक एकाला खाली सोडत होती जस जस एक एक खाली आरामशीर येत होत तसतसे बाकीच्यांची पण हिम्मत वाढत होती बघता बघता सर्व सुखरूप कुठलीही इजा न होता सर सर खाली आली आणि स्वप्नात पण वाटणार नाही असा अनुभव घेतल्यावर जे चेहऱ्यावरचं तेज अल होत ते शब्दात सांगू शकत नाही.नंतर सर्वांनी गरमा गरम खिचडी त्यात जोडीला गुलाब जमुन खाऊन आम्ही परती च्या प्रवाशाला निघालो वाटेत आम्ही घंटा नाद करणार दगड पाहण्यास थांबलो खरंच त्या दगडावर मारल्यावर निसर्गाचा एक अदभुत चमत्कार पहावयास मिळाला अस म्हणतात की ते दगड ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे तयार झालेलं असावे आणि त्यात लोहाचं प्रमाण जास्त असावे म्हणून घंटा नाद येत असावा.तो एक अनुभव घेऊन आणि एक जीवनातील अविस्मरणीय अनुभवाची शिदोरी घेऊन आम्ही सर्व रात्री १० वाजता घरी पोहचलो ते प्रत्येकाची इच्छा होती आता परत कधी करायचं Rappling.

सचिन भांड

सह्याद्री ट्रेकर्स 


फोटो पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

https://photos.app.goo.gl/Czgd55m4XdC4qGvs7



देवभूमी यात्रा

  ​ *श्रीरामपूर ते देवभूमी*: केदारनाथ, बद्रीनाथ, तुंगनाथ आणि* ऋषिकेशचा अंगावर काटा आणणारा प्रवास!* दिनांक 09 जून ते 19 जून 2026 ​‘मनात भक्ती...