Wednesday, September 1, 2021

आडराई जंगल ट्रेक

सह्याद्रि ट्रेकर्स आयोजित,

आडराई जंगल ट्रेक
 29 ऑगस्ट 2021




 ह्याद्रीच्या उंच उंच  रांगांमधून कोकणात  उतरणाऱ्या  पायवाटांची  जागा  आता सिमेंट डांबर  च्या  रस्त्याने बनत  चालली  आहे .त्यात  ही  नागमोडी  वळणे सरळ  होत  चालली दूरचा  प्रवास  कमी होत  चालला अशा  अनेक  प्रकारच्या  घाट रस्त्यामधील अनेकांना खुणावणारा माळशेज  घाट आणी  घाटाच्या  समोरील  असणारा  हरिश्चंद्र गड ह्या  दोन्ही डोंगरांच्या कुशीत वसलेलं खिरेश्वर हे  गाव ह्या गावाचे वर्णन करावयासे झाल्यास तीनही बाजूने हिरवीगार डोंगररांग आणी एका  बाजूस  विस्तीर्ण पसरलेला पिंपळगाव जोगा धरण. खिरेश्वर ला आल्यावर येथील डोंगररांगांच्या काळ्याभिन्न पाषाणाला जलधारा अखंडपणे  प्रेमाणे न्हाऊ घालतेय का  असा भास होतो. असे हे खिरेश्वर गावं आम्हा भटक्यांना तस नवखे नाही. कारण ह्या गावातूनच एक वाट  आम्हा भटक्यांची पंढरी असणाऱ्या हरिश्चंद्र गडावर जाते.

मागील तीन ते चार वर्षांपासून प्रकाश झोतात आलेलं आडराई जंगल म्हणजे आडवाटेवर देवाने बनवलेली वनराई.हा ट्रेक म्हणजे जंगलातून जाणारी पदभ्रमंती आणि सोबतीला असणारे असंख्य असे पांढरे शुभ्र धबधबे.असा हा ट्रेक करण्याची मनोमन इच्छा मागील वर्षांपासून मनात घर करून बसली होती परंतु सध्या आपल्या मानगुडीवर बसलेलं हे करोनाच भूत सुटता सुटत नव्हतं पण ह्या वर्षी हि पदभ्रमंती करायचीच ह्या उद्देशाने ह्या ट्रेक ची संकल्पना मी आमचे सहकारी चंदन सर आणि उमेश शिंदे यांच्या जवळ व्यक्त केली आणि 29 ऑगस्ट ची तारीख निश्चित करून पुढचे नियोजन चालू केले.सुरवातीला मोजकेच भटके नेण्याचं नियोजन पुढे जाऊन वाढतच गेलं त्यामुळे सुरवातीला सकाळी निघायचं नियोजन बदलून आधल्या दिवशी रात्री निघायचं ठरल.कारण संख्या जास्त झाल्याने पुढे सगळ्या गोष्टीत उशीर होऊ शकतो याची कल्पना मला आली.म्हणून ट्रेक च्या आधल्या दिवशी निघायचं ठरलं त्यात लहान मुलांना पण सोबत घेण्याचे ठरल्यावर जस जशी ट्रेक ची तारीख जवळ येत होती तस तशी  त्यांचा उत्साह अगदी शिगेला पोहोचला होता.त्यात आम्ही देखील अपवाद नाही म्हणा.

अन बघता बघता तो दिवस उजेडला आणि  ठरल्या वेळेनुसार आम्ही श्रीरामपूर सोडून खिरेश्वर च्या दिशेने मार्गस्त झालो. रात्रीच्या किर्र अंधारात डोळे ताणून  जेव्हा पिंपळगाव जोगा धरणाच्या भिंतीवरून आमची गाडी निघाली तेव्हा तर आमच्या गाडीने धुक्याची चादर लपेटून त्यात गुडूप होण्याचा अनुभव देखील घेतला असा हा हलकासा गारवा अंगावर घेत पहाटेच्या वेळेत आम्ही खिरेश्वर गावात पोहचलो. तिथे पोहचल्यावर आमचा गावातील सहकारी उमेश उंडे आमची वाटच पाहत होता आणि नेमके त्याच्या घरी जात असताना रस्त्यात आमच्या एका गाडीचे चाक गाळात फसले आणि आता चांगलीच कसरत करावी लागणार होती परंतु आम्हाला नेहमीच असा अडचणीच्या वेळेस आम्हाला साथ देणारा रोप गाडी बाहेर काढण्यासाठी  कामी आला. नंतर गाडीतच थोडा आराम करून दिवस उजेडण्याची वाट पाहत होतो. जस जसा उजेड पडत होता तसतसा श्रावण सरींनी भिजणारा सह्यगिरी चे विलोभनीय दृश्य डोळ्यांप्रमाणे मनालाही चैतन्य देत होता.

थोडा उजेड पडल्यावर आम्ही उमेश च्या घरी फ्रेश होऊन मनमुराद चहा पोहे चा अस्वाद घेऊन intro round ला उभे राहिलो सगळ्यांची ओळख करून झाल्यावर ग्रुप मोठा असल्याने आम्ही  दोन  ग्रुप केले  त्या प्रमाणे अनुभवी भटके हे चंदन सर लीड करणार होते  आणि बाकीचे मी करणार होतो अशा प्रकारे दोनही ग्रुप आडराई जंगल पद भ्रमंती करण्यास मार्गस्त झालो जस जसे पुढे जात होतो तसतसे निसर्ग आम्हाला पुढे येणाऱ्या विलोभनीय दृश्यांची अनुभूती देत होता

पुढे चालत आल्यावर एका पठारावर आम्ही आलो तिथे सर्वांनी फोटोग्राफी चा आनंद घेतला पुढे जंगलाच्या दिशेने निघालो आता खर वाटायला लागले याला देवाची वनराई का म्हणतात कारण अजस्र्र असे वृक्ष वेली पाहून असे वाटते खरच आपण आपल्या स्वार्थासाठी किती निसर्गाची हाणी करतोय पुढे चालत गेल्यावर आम्ही reverse water fall जवळ आलो पण सध्या पाऊस वारा काही नसल्याने ते मोहक दृश्य पाहण्यास आम्ही मुकलो पुढे शेवटच्या टप्प्यावर पाण्याच्या प्रवाहात सर्वांनी अगदी लहान मुलांसारखे होऊन मनसोक्त आनंद लुटला त्या नंतर आल्या त्या मार्गाने परतीचा प्रवास चालू केला तेथून आम्ही ज्या धबधब्याची वाट पहात होतो तो म्हणजे काळू नदीवर निसर्ग निर्मित 1200 फुटांवरून कोसळणारा  काळू धबधबा  त्याचं सौंदर्य पाहून सर्वानीच वेगवेगळ्या पोजेस देऊन फोटोग्राफी चा आनंद घेतला. एव्हाना आता सर्वांच्याच पोटात कावळे ओरडण्यास सुरुवात झालीच होती म्हणून आम्ही तिथून उमेश च्या घरी पोहचलो आणि सर्वानीच त्याच्या सुंदर अशा जेवणावर ताव मारून उमेश चा निरोप घेतला आणि  नियोजित वेळेत सुखरूप  आम्ही श्रीरामपूर कडे छानश्या आठवणी सोबत घेत प्रस्थान केलं. फक्त एकच खंत मनात राहिली वरून राजा आज काय आम्हाला प्रसन्न झाला नाही. 

असा हा निसर्गाने भरभरून दिलेला ट्रेक प्रत्येकानेच एकदा तरी करावा.🚩🚩🚩🚩

सचिन भांड

सह्याद्रि ट्रेकर्स

श्रीरामपूर,

देवभूमी यात्रा

  ​ *श्रीरामपूर ते देवभूमी*: केदारनाथ, बद्रीनाथ, तुंगनाथ आणि* ऋषिकेशचा अंगावर काटा आणणारा प्रवास!* दिनांक 09 जून ते 19 जून 2026 ​‘मनात भक्ती...