गणपती गडद ट्रेक
दि.०१ ऑक्टोबर २०२३
गणपती गडद
ह्या पावसाळी भटकंती चे माझे नियोजन हे आधीच पक्के होते त्या दृष्टीने असे काही ठिकाण निवडले होते जे या सोशल मीडिया आणि पावसाळी गर्दी पासून दूर असेल जिथे फक्त न फक्त निसर्ग अन आपण असू अशाच ठिकाणी भेट देयची त्या दृष्टीने च आत्तापर्यंत चे ह्या पावसाळी भटकंती चे आमचे नियोजन हे अगदी उत्तम रीत्या आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सुरक्षित पार पाडले.यातील काही ठिकाणे तर अशी होती ती अगदी या सोशल मीडिया पासून दुर्लक्षित त्या मुळेच कदाचित जेव्हा आम्ही हे ट्रेक करून यायचो तेव्हा लोक विचारायचे कुठे आहे हा spot त्याचा प्रत्यय प्रत्येकाला आलाच असेल.त्या मधील च आमचा पुढचा ट्रेक adventure मध्ये मोडणारा होता शितकडा waterfall rappling चा हा ट्रेक रेग्युलर ट्रेक सारखा नसल्यामुळे काही कारणास्तव तांत्रिक समस्या निर्माण झाल्यामुळे मी ते ठिकाण बदलुन.पुढचा adventure ट्रेक निवडला तो म्हणजे गणपती गडद waterfall rappeling चा.
आता हे गडद म्हणजे नेमकी काय तर डोंगरात कोरलेली लेणी अथवा गुहा. गणपती गडदला जायचं झाल्यास प्रवास मोठा आहे पण हा ट्रेक वसूल आहे. गणपती गडदचा प्रवास म्हणजे आळेफाटा माळशेज,आणि ह्या घाटावर आणि नाणेघाट वर नजर ठेवण्यासाठी असलेला मोरोशी चा भैरवगड आणि मग गणपती गडद हे गाव म्हणजे पायथ्याशी असलेलं सोनावळे. सोनावळे गावात प्रवेश केल्यावरच डाव्या हाताला डोंगरात कोरलेली लेणी दिसते तेच गणपती गडद.
तसेच या गावाला खेटून च पळु हे गाव लागते गावाबद्दल असे सांगितले जाते. या गावात मोरे आडनावाची माणस मोठ्या प्रमाणात राहातात. हे सर्व जावळीच्या चंद्रराव मोर्यांचे वंशज आहेत. शिवाजी महाराजांनी जावळीवर हल्ला करुन चंद्रराव मोरेचा पराभव केला. त्यावेळी तिथुन पळुन आलेले मोर्यांचे लोक त्याकाळच्या मुघल साम्राज्यातील सोनावळे गावात स्थायिक झाले. त्यामुळे या गावाला पळु (पळुन आलेल्या मोर्यांमुळे "पळु") असे नाव पडले असावे.
संपूर्ण रात्रीचा प्रवास करून सकाळी पाच वाजताच्या सुमारास आम्ही सोनावले गावात पोहोचलो निसर्गाच्या सानिध्यात फ्रेश होऊन चहा नास्ता चा आस्वाद घेतला आता इथून पुढे दीड तासांचा ट्रेक करून गुहेपासून आम्ही rappeling सुरवात करणार होतो तत्पूर्वी ग्रुप मधील जवळपास सर्वच सदस्य हे पहिल्यांदाच rappeling चा अनुभव घेणार होते त्यामुळे त्यासाठी लागणाऱ्या साहित्याची ओळख करून rappeling कशा पद्धतीने करायचे याचे थोडक्यात मार्गदर्शन करून सरळ वर चढायला सुरुवात केली.पाऊस नसल्याने हवेत प्रचंड दमट पणा होता त्यामुळे हालत होणार हे नक्कीच होतं खरं तर गणपती गडद करायचं झाल्यास पाऊस हा असायलाच हवा. चोहोबाजूंनी बाजुंनी फेसाळते धबधबे तेंव्हाचं निसर्गसौंदर्य काही औरच असतं. पण असो आम्ही सुमारे 07 च्या सुमारास चालायला सुरुवात केली गावात गावकऱ्यांची भात शेती चा सुगंध हा चोहोबाजूंनी दरवळत च होता .
पुढेच एक ओढा वाहत होता तिथेच जवळ काही विरगळी शेवटच्या घटका मोजत असताना दिसल्या वीरगळ म्हणजेच विरपुरुषांच्या प्रति उभारण्यात आलेला स्तंभ त्या स्तंभावर त्या विरपुरुषा चे तीन ते चार चौकटीत युद्ध प्रसंग कोरलेले असतात त्याला च वीरगळ म्हणतात तेथील ओढा पार करुन आम्ही आमच्या वाटेला लागलो गप्पा मारत मारत आम्ही पुढे जात होतो जसंजसे पुढे जात होतं तसंतसं आम्हाला आमचं ध्येय जवळ दिसत होतं पण वाट लांबची होती कारण आत्ताशी पाऊलवाट होती. अजून चढाईला वेळ होता. पण एवढ्या गरमीमध्येसुद्धा एकच गोष्ट चांगली होती की ह्या जंगलात बघायला खूप काही मिळाले. छोटे छोटे कीटक नवीन नवीन फुलं पक्षी पाहत आम्ही आमचा प्रवास चालूच ठेवला होता.
आता मात्र चढाईला सुरुवात झाली होती. सुमारे अर्धा तासाचीच असणारी चढाई दमट वातावरणामुळे जास्तच वाटत होती म्हणून आरामात वर चढत आता आम्ही थेट गणपती गडद च्या प्रवेशद्वारापाशी पोहोचलो. बाजूलाच तुषार रुपी धबधबा पडतच होता तेथून थेट गडदीत प्रवेश केला गडदीतुन समोरचा निसर्ग स्पष्ट दिसत होता समोर तीन तलाव उजव्या बाजूला नाणेघाट.
समोरचा निसर्ग शांतपणे अनुभवून आम्ही गडदीतल्या गणपतीचं दर्शन घेतलं. गर्दी नसल्यामुळे गडदीमध्ये बऱ्यापैकी शांतता होती.आता इथून पुढे आम्ही सर्व ज्याची वाट पाहत होतो तो rappeling चा थरार अनुभवण्यासाठी साठी सज्ज होतो.एक एक करून सर्वांनी हर्णेस हेल्मेट परिधान करून उतरायला सुरुवात केली सुरवातीला थोडे घाबरल्या सारखे वाटते पण एकदा की rappel करून खाली आलो की पुन्हा पुन्हा rappeling कारावेसे वाटते हाच फरक आहे rappeling आणि rock climbing चा हं rock climbing मध्ये पूर्ण पणे तुमच्या शरीराचा कस लागतो.
आयुष्यात आपण पण काहीतरी थ्रिल अनुभवलं याचा सुखद अनुभव प्रत्येकाच्या चेहऱ्यावर होता.
तो सुखद अनुभव गाठीशी बांधून आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली जस जसे आम्ही खाली उतरत होतो तस तसे मागे वळून बघितल्यावर गणपती गडदचे खरे सौंदर्य नजरेस पडत होते.त्याकडे ५ मिनिटं एक टक लावून बघून पुन्हा आपली वाट धरली आणि थेट गावात जाऊन थांबलो.
एव्हाना ०४ वाजले होते आणि पोटात कावळे कोकायला सुरवात झालीच हाती गावात उतरून रुचकर अशा शाखाहरी आणि मांसाहार चा आस्वाद घेऊन परतीच्या प्रवासाला लागलो.
आणि सर्वात महत्वाचे म्हणजे हा एक technical event होता म्हणून सोबतीला आमची सह्याद्रि मधील भागिनी साह्य गिरी adventure ची कुसुम विशे हिच्या मदतीने हा event सुखरूप पार पडला कुसुम बद्दल सांगायचे झाल्यास ती एक cirtified रॉक क्लायम्बर तर आहेच आणि रेस्क्युअर शिवाय स्वतःच घर सांभाळून गेली कित्येक वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत आहेत. तसेच पावसात पाण्यात,पुरात अडकलेल्या माणसांनाच नव्हे तर प्राण्यांना देखील वाचवणारे, किंबहुना जीवदान देणारे देवदूतच आहेत ते. रात्री-बेरात्री, वेळी-अवेळी दऱ्याखोऱ्यात अडकलेले रस्ता चुकलेले ट्रेकर्स पर्यटक यांना तर ते मदत करतातच परंतु दरीत पडलेले मृतदेह, काही वेळेस कुजलेले मृतदेह मेडिकेटेड करून,स्वच्छ करून कित्येक हजार फुटांवरून वर आणणे आणि पोलिसांच्या मदतीने ते ताब्यात देणे असे कठीण आणि निस्वार्थी कार्य ते करत आहे.कोणत्याही मोबदल्याशिवय हे कार्य करत आहेत त्यांच्या या महान कार्याला माझा आणि माझ्या टीमचा सलाम. हॅट्स ऑफ कुसुम आणि दीपक विशे.
सचिन भांड पाटिल
सह्याद्रि परिवार श्रीरामपूर







