हरिश्चंद्रगड महिला विशेष ट्रेक..
१० जानेवारी २०२१.
सध्या च्या युगात पुरुषांच्या बरोबरीने सर्व जबाबदाऱ्या आत्मविश्वासाने हाताळणाऱ्या, दैनंदिन आयुष्यातील पेच प्रसंगांना थेट सामोऱ्या जाणाऱ्या आणि आता सामाजिक पातळ्यांवर लादण्यात येणारी बंधने धैर्याने बाजूला सारून श्रीरामपुर सारख्या ग्रामीण भागातील ही श्री 'शक्ती' १०जानेवारी.म्हणजेच दोनच दिवसा नंतर येणाऱ्या राजमाता जिजाऊ मासहेबांच्या जन्मदिनी.अश्या ह्या जिजाऊ च्या लेकी एकवटल्या त्या कोणत्याही परिस्थितीत सामोरे जाण्यास, त्याच्या विरोधात लढण्यास आम्ही सक्षम आहोत, मोकळेपणाने श्वास घ्या. अभिमानाने जगण्याची सुरुवात करा. आपनच आपल आरोग्याचा कसा सांभाळ करायचा असा हा संदेश देऊन या महिलांनी ट्रेक चा बिनधास्त मनमोकळेपणाने आनंद घेतला.
सह्याद्रीतील भटक्यांची पंढरी, सह्याद्रीचा मुकुट मनी अशी ना ना प्रकारची विशेषणे जर कोणासाठी वापरली जात असतील तर आम्हा भटक्यांच्या तोंडी एकाच नाव येतं ते म्हणजे हरिशचंद्रगड.
हरिश्चंद्र गडाला भटक्यांची पंढरी का म्हणतात हे खर तर आपण तिथे भेट दिल्यावर कळत कारण प्रत्येक वेळी वेग वेगल दिसणार तीच सौदर्य पावसाळ्यात तर ते अजुन फुलून दिसत पृथ्वी वरील स्वर्ग जर पहायचं असेल तर एकदा तरी पावसाळ्यात प्रत्येकाने भेट दिलीच पाहिजे आणि ह्या पंढरीचा मी एक वारकरी दर वर्षी निदान दोन तीनदा तरी न चुकता भेट देणारा.गडाचा ,इथल्या मातीचा आणि सर्वात महत्वाचं इथल्या माणसाचा माझा जिव्हाळ्याचा संबंध अगदी की माझं सह्याद्री तील दुसर घरच. अश्या खूप साऱ्या आठवणी ह्या मातीत जडल्या आहेत.कारण सह्यद्रीतील अवघड ट्रेकच्या प्रवासाला माझी ह्याच गडापासून सुरवात झाली ती पण रोप लावून गडावर जाणाऱ्या कोकणकड्याच्या बाजूच्या नळीच्या वाटेने अन परत पाचनई गावात उतरून सादाडे घाटातून खाली उतरलो असा हा तब्बल अठरा तासाचा ट्रेक मी माझ्या जुन्या ग्रुप बरोबर एकाच दिवसात केला होता
तश्या गडावर जाण्यासाठी खीरेश्र्वर,नळीची वाट, सदडे घाट,माकड नाळ आणि सर्व आबालवृद्धांना घेऊन जाणारी तितकीशी सोईस्कर अशी पाचणाई मार्गे तसे पाच्नाई गावाला हे जे नाव पडलं ते इथे उगम पावणाऱ्या पाच उप नद्या मुळे.ह्या गावातून फक्त दोनच तासात आपण गडावर पोहचतो हरिश्चंद्रगड हा ठाणे ,पुणे,नगर, च्या सीमेवर आणि माळशेज घाटाच्या डावीकडे असणारा अजस्त्र असा डोंगर ह्या गडाला तसा महाराजांच्या लढाईचा जास्त इतिहास नसला तरी गडाला 2/3 हजार वर्षांपूर्वीची पौराणिक पार्श्वभूमी आहे आदिवासी कोळी महादेव समाजाच्या ताब्यात असणारा हा गड मोगलांनी ताब्यात घेतला पुढे तो मराठ्यांनी 1747-48 मध्ये मुगलांकडून ताब्यात घेतला.तसेच ह्या गडावर हरिश्चंद्र रोहिदास तारामती अशी शिखरे असल्या मुळे त्याचा संदर्भ थेट राजा हरिशचंद्र यांच्याशी देखील जोडला आहे जेव्हा राजाने कुबेरा कडून कर्ज घेतले होते ते फेडता न आल्याने राजा इथे वास्तव्यात होते असे गावकरी सांगतात त्याच प्रमाणे ह्या गडावरील मंदिराच्या मागील गुहेत चांगदेव महाराजांनी 1400 वर्ष तपश्चर्या केली आहे अस देखील सांगतात.
गडावर सुमारे 12 व्या शतकापेक्षा जुने शालिवाहन काळातील हरिहरेश्वर च शिवमंदिर आहे तसेच प्राचीन लेणी आणि मंदिरा समोर सुंदर अशी पुष्करणी देखील आहे.तसेच गुहेतील केदारेश्वर च मंदिर तर अदभुत च आहे अस म्हणतात की सत्य युगात धर्म चार पायांवर उभा असतो त्रेता युगात 3 पायावर द्वार युगात 2 पायावर आणि कली युगात सध्या एका पायावर असे हे शिवलिंग पाहिल्यावर आपल्याला हे लक्षात येतं मूळचे चार खंबनी वेढलेल आज एकाच खांबावर उभेआहे.
मंदिराच्या मागील बाजूने एक वाट अजाष्र अशा कोकण कड्याकडे जाते कोकण कड्याच वर्णन शब्दात व्यक्त न करण्यासारखे आहे.पूर्वी अतिशय सुंदर देखण कोकण कडयाच रूप आता लोखंडी तटबंदीने वेढल आहे.प्रत्येक ऋतु मध्ये वेग वेगळं दिसणार कोकणकड्या च हे रूप तुमचं नशिब जर चांगले असले तर तुम्हाला ढगांच्या गर्दीत स्वर्गात असल्याचा भास नक्कीच होतो.
असा हा सुंदर गड करण्याचं R S Fitness च्या संचालिका सुरोडकर मॅडम यांचा डिसेंबर मध्ये फोन आला आम्हा महिलांना हरिश्चंद्र गड ट्रेक करायची खूप इच्छा आहे त्या साठी तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करावे.परंतु डिसेंबर मध्ये माझे काही ट्रेक असल्या मुळे क्षणाचा पण विलंब न करता आपल्या सारख्या ग्रामीण भागातून ट्रेक करण्याची महिलांची इच्छा तयार होत आहे हे जाणून खूप आनंद झाला आणि त्या ऐतिहासिक क्षणाचे आपण एक त्यांना सह्याद्री पर्यंत पोहचण्याचे माध्यम बनत आहोत म्हणून लगेच जानेवारी ची तारीख दिली. त्या नुसार गडावरील सर्व व्यवस्था करण्यास आमचा सह्याद्रीतील सोबती प्रकाश ला सांगितले.जस जशी ट्रेक ची तारीख जवळ येत होती तास तसे महिलांचा उत्साह किती वाढत होता ते मॅडम चे जेव्हा जेव्हा फोन येत होते त्या वरून कळत होते.त्यातच अगदी तारीख जवळ आल्या मुळ ऐन थंडी मध्ये पावसाळी ढग निर्माण झाल्यामुळं निसर्गानं हे एक वेगळंच वळण घेतलं त्या मुळ कुठ तरी आपली ही इच्छा पुढं सरकती का काय असे देखील महिलांच्या मनात येत असेल पण आम्हा भटक्यांना हवा हवासा वाटणारा च तो बदल होता हे त्या जेव्हा गडाच्या मध्यावर आले आणि पहाटेची ती हलकी चादर बाजूला झाली तेव्हा अनुभवला च असेल.
अश्या प्रकारे ज्या दिवसाची ह्या सर्व वाट पाहत होता तो दिवस अखेर उजेड ला रात्री ठीक १२ वाजता गाडी आली आणि आमचा प्रवास चालू झाला तो गडाच्या पायथ्या ला असणाऱ्या पाच्णाईं गावाकडे सकाळी आम्ही गावात ५ वाजता पोहचल्यावर फ्रेश होऊन चहा घेऊन लगेच पहाटेच्या अंधारात ट्रेक चालू केला सोबत माझा छोटा ट्रेकर म्हणजे माझा मुलगा सोबत होताच तो देखील १/२ वेळेस गडावर आल्या मुळे त्याला रस्ता चांगलाच माहितीच होता म्हणून त्यालाच मी सर्वात पुढे राहण्यास सांगितले आणि मी मागे कारण सर्वात शेवटच्या माणसाला सुखरूप गडावर नेने आणि गडावरून खाली आणणे हे शेवटच्या माणसाचे काम असते त्या नुसार ८.३० पर्यंत आम्ही गडावर पोहच तो न पोहाच तो तेच महिलांचा आवडता विषय म्हणजे फोटोग्राफी चा मनमुराद आनंद त्यानी लुटला आणि त्या फोटोग्राफी साठी सोबतीला अधून मधून हेलकावे खाणाऱ्या दाट धुक्याची चादर होतीच.तेथून लगेचच आम्ही प्रकाश कडे गेलो.आणि आमच्या अनिता ताई ने लगेचच सुंदर असे पोहे चहा नाष्टा खाऊन आम्ही कोकण कड्या कडे गेलो कोकण काड्याचं सुंदर देखन रूप पाहून तर योगा रोमा रोमात भिनलेले असल्या मुळे योगासनाचे प्रात्यक्षिके करण्याचा मोह आमच्या सर्व ताई ना राहवलं नाही.आणि ते फोटो घेण्याचा मोह मला.असा हा पुरेपूर आनंद घेऊन आम्ही परत प्रकाश कडे आलो आणि स्वयंपाक तयार होऊ पर्यंत आम्ही हरिहरेश्वर च दर्शन घेतले तिथे काही दिवसापूर्वी विठ्ठल रखुमाई मूर्तीची चोरी झाल्यामळें नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होती त्या मुळ आपण देखील ह्या क्षणाचे साक्षीदार झालोत याचा देखील एक वेगळा आनंद झाला.तिथून आम्ही केदारेश्वर च अदभुत अस मंदिर पाहून पुष्करणी पासी आल्यावर सोशल मीडिया वर असणाऱ्या पुष्करणी मधील देवळी च्या ठिकाणच्या ज्या poses असतात त्या प्रमाणे फोटो काढण्याचा प्रयत्न केला.त्या नंतर लगेचच आम्ही सर्वांनी अनिता ताईच्या हतचा गरमागरम कांदा बटाटा भाजी,ठेचा भाकरी चा मनमुराद आनंद घेऊन गड उतारास सूरवत केली .सायंकाळी ४.३० वाजे पर्यंत आम्ही सर्व पायथ्याला सुखरूप पोहचलो आणि आमचा परतीचा प्रवास चालू झाला तो सोबत असा सुंदर आठवणीची शिदोरी घेऊन.
असा हा सुंदर आणि अविस्मरणीय ट्रेक सर्व ह्या अनोळखी महिलांनी माझ्या वर जो विश्वास दाखवून आणि त्यांचा हा विश्वास माझ्या परीने सह्याद्री ची ओळख करून देण्यास मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न केला तरी देखील काही कमी जास्त चुकले असतील तर क्षमस्व.
सह्याद्रीत कधी ही फिरायची इच्छा झाल्यास ह्या तुमच्या भावाला हाक मारा तो तयार असेल.
सर्वात शेवटी मझ एकाच सांगणं अस्त...
महाराष्ट्र च्या भूमीत जन्माला यावे आणि किल्ले शिखर पाहू नये, हे होवूच शकत नाही. प्रत्येकाने आपल्या आयुष्यात वर्षातून एकदातरी किमान दोन दिवसांचा वेळ काढून किल्ल्यावर जावून एका आगळ्यावेगळ्या नंदनवनात जावून येण्याचा अविस्मरणीय अनुभव घ्यावाच, नाहीतर आयुष्य व्यर्थच गेले असे समजा!!
सचिन भांड
sahyadritrekers.blogspot.com