सह्याद्रि ट्रेकर्स आयोजित,
रतनगड ट्रेक
17 oct.2021
17 oct.2021
मागील तीन ते चार वर्षांपासून प्रकाश झोतात आलेलं आडराई जंगल म्हणजे आडवाटेवर देवाने बनवलेली वनराई.हा ट्रेक म्हणजे जंगलातून जाणारी पदभ्रमंती आणि सोबतीला असणारे असंख्य असे पांढरे शुभ्र धबधबे.असा हा ट्रेक करण्याची मनोमन इच्छा मागील वर्षांपासून मनात घर करून बसली होती परंतु सध्या आपल्या मानगुडीवर बसलेलं हे करोनाच भूत सुटता सुटत नव्हतं पण ह्या वर्षी हि पदभ्रमंती करायचीच ह्या उद्देशाने ह्या ट्रेक ची संकल्पना मी आमचे सहकारी चंदन सर आणि उमेश शिंदे यांच्या जवळ व्यक्त केली आणि 29 ऑगस्ट ची तारीख निश्चित करून पुढचे नियोजन चालू केले.सुरवातीला मोजकेच भटके नेण्याचं नियोजन पुढे जाऊन वाढतच गेलं त्यामुळे सुरवातीला सकाळी निघायचं नियोजन बदलून आधल्या दिवशी रात्री निघायचं ठरल.कारण संख्या जास्त झाल्याने पुढे सगळ्या गोष्टीत उशीर होऊ शकतो याची कल्पना मला आली.म्हणून ट्रेक च्या आधल्या दिवशी निघायचं ठरलं त्यात लहान मुलांना पण सोबत घेण्याचे ठरल्यावर जस जशी ट्रेक ची तारीख जवळ येत होती तस तशी त्यांचा उत्साह अगदी शिगेला पोहोचला होता.त्यात आम्ही देखील अपवाद नाही म्हणा.
अन बघता बघता तो दिवस उजेडला आणि ठरल्या वेळेनुसार आम्ही श्रीरामपूर सोडून खिरेश्वर च्या दिशेने मार्गस्त झालो. रात्रीच्या किर्र अंधारात डोळे ताणून जेव्हा पिंपळगाव जोगा धरणाच्या भिंतीवरून आमची गाडी निघाली तेव्हा तर आमच्या गाडीने धुक्याची चादर लपेटून त्यात गुडूप होण्याचा अनुभव देखील घेतला असा हा हलकासा गारवा अंगावर घेत पहाटेच्या वेळेत आम्ही खिरेश्वर गावात पोहचलो. तिथे पोहचल्यावर आमचा गावातील सहकारी उमेश उंडे आमची वाटच पाहत होता आणि नेमके त्याच्या घरी जात असताना रस्त्यात आमच्या एका गाडीचे चाक गाळात फसले आणि आता चांगलीच कसरत करावी लागणार होती परंतु आम्हाला नेहमीच असा अडचणीच्या वेळेस आम्हाला साथ देणारा रोप गाडी बाहेर काढण्यासाठी कामी आला. नंतर गाडीतच थोडा आराम करून दिवस उजेडण्याची वाट पाहत होतो. जस जसा उजेड पडत होता तसतसा श्रावण सरींनी भिजणारा सह्यगिरी चे विलोभनीय दृश्य डोळ्यांप्रमाणे मनालाही चैतन्य देत होता.
थोडा उजेड पडल्यावर आम्ही उमेश च्या घरी फ्रेश होऊन मनमुराद चहा पोहे चा अस्वाद घेऊन intro round ला उभे राहिलो सगळ्यांची ओळख करून झाल्यावर ग्रुप मोठा असल्याने आम्ही दोन ग्रुप केले त्या प्रमाणे अनुभवी भटके हे चंदन सर लीड करणार होते आणि बाकीचे मी करणार होतो अशा प्रकारे दोनही ग्रुप आडराई जंगल पद भ्रमंती करण्यास मार्गस्त झालो जस जसे पुढे जात होतो तसतसे निसर्ग आम्हाला पुढे येणाऱ्या विलोभनीय दृश्यांची अनुभूती देत होता
पुढे चालत आल्यावर एका पठारावर आम्ही आलो तिथे सर्वांनी फोटोग्राफी चा आनंद घेतला पुढे जंगलाच्या दिशेने निघालो आता खर वाटायला लागले याला देवाची वनराई का म्हणतात कारण अजस्र्र असे वृक्ष वेली पाहून असे वाटते खरच आपण आपल्या स्वार्थासाठी किती निसर्गाची हाणी करतोय पुढे चालत गेल्यावर आम्ही reverse water fall जवळ आलो पण सध्या पाऊस वारा काही नसल्याने ते मोहक दृश्य पाहण्यास आम्ही मुकलो पुढे शेवटच्या टप्प्यावर पाण्याच्या प्रवाहात सर्वांनी अगदी लहान मुलांसारखे होऊन मनसोक्त आनंद लुटला त्या नंतर आल्या त्या मार्गाने परतीचा प्रवास चालू केला तेथून आम्ही ज्या धबधब्याची वाट पहात होतो तो म्हणजे काळू नदीवर निसर्ग निर्मित 1200 फुटांवरून कोसळणारा काळू धबधबा त्याचं सौंदर्य पाहून सर्वानीच वेगवेगळ्या पोजेस देऊन फोटोग्राफी चा आनंद घेतला. एव्हाना आता सर्वांच्याच पोटात कावळे ओरडण्यास सुरुवात झालीच होती म्हणून आम्ही तिथून उमेश च्या घरी पोहचलो आणि सर्वानीच त्याच्या सुंदर अशा जेवणावर ताव मारून उमेश चा निरोप घेतला आणि नियोजित वेळेत सुखरूप आम्ही श्रीरामपूर कडे छानश्या आठवणी सोबत घेत प्रस्थान केलं. फक्त एकच खंत मनात राहिली वरून राजा आज काय आम्हाला प्रसन्न झाला नाही.
असा हा निसर्गाने भरभरून दिलेला ट्रेक प्रत्येकानेच एकदा तरी करावा.🚩🚩🚩🚩
सचिन भांड
सह्याद्रि ट्रेकर्स
श्रीरामपूर,
भैरवगड ट्रेक🚩
भैरवगड (शिरपुंजे), अकोले, नगर जिल्हा.
गडाचा प्रकार- गिरीदुर्ग
डोंगररांग- घनचक्कर
गडाची उंची- ३७९२ फूट
श्रेणी- मध्यम
आजमितीस कोरोना या महामारी सदराखाली आपण सर्वजण एका विशिष्ट प्रकारच्या महाभयंकर गुलामीच्या आणि मरणासन्न परिस्थितीकडे वाटचाल करीत आहोत. त्यात आमच्या सारखे भटके देखील होरपळून निघत आहोत महिन्यातून एक दोनदा तरी सह्याद्रीत फिरणारा मी आता तिन ते चार महिने तरी सह्याद्रि च्या वाटेवर नजर लावून बसलेला असतो.त्यातच सर्व जण पुढच्या ट्रेक ची वाट पहातच होते.पण सध्याची परिस्थिती पाहता आपण बघतोय काही प्राचिलीत किल्ल्यावर जत्रे सारखी झुंबड पडत आहे .म्हणूनच अशा निर्जन किल्यावर भेट द्यायचा विचार करत असताना पाच वर्षांपूर्वी केलेला भैरवगड डोक्यात आला.
अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्याला खरं तर निसर्गाचं वरदान आणि सह्याद्रीच्या गड-किल्ल्यांचं कोंदण लाभलंय. भंडारदराच्या धरणाच्या अवतीभोवती नांदणारे गड-किल्ले म्हणजे सह्याद्रीच्या भक्तांचे जीव की प्राणच! या तालुक्यात कोणत्याही ऋतूत आणि कोणत्याही दिवशी या, इथला निसर्ग तुम्हाला वेड लावल्याशिवाय राहणार नाही. इथल्या शिरपुंजे गावात असंच एक गडरत्न उभं आहे. हे रत्न संपूर्ण पंचक्रोशीतल्या भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं क्षेत्र भैरवगड म्हणूनही ओळखलं जातं. भैरवगड शिरपुंजे चा हा किल्ला म्हणजे भटक्यांची पांढरी असलेल्या हरीशचंद्रगड, पण सध्याची तेथील गर्दी ची परिस्थिती पाहता त्याच्याच प्रभावळीत असलेल्या कुंजरगड (कोंबडगड) , भैरवगड (कोथळे) , कलाडगड , भैरवगड (शिरपुंजे) या किल्ल्यांवर फ़ारच कमी दुर्ग भटके जातात. हरीशचंद्रगडकडे जाणार्या विविध मार्गांवर लक्ष ठेवण्यासाठी प्राचीनकाळी हे किल्ले बांधलेले असावेत.
महाराष्ट्रातील ६ भैरवगडांपैकी २ भैरवगड हे हरिश्चंद्रगड पर्वतरांगेत आहेत. कोथळ्याचा भैरवगड आणि शिरपुंज्याचा भैरवगड.
भैरवनाथ/भैरोबा हे स्थानिक लोकांचे दैवत आहे येथे अश्विन महिन्यात यात्रा भरते. शिरपुंजे गावातून ५०० मीटर उंचीवर भैरववगडाचे मंदिर आहे आणि पुर्ण वाट खडी चढण आहे. वाटेवर अनेक ठिकाणी कातळकोरीव पायर्या आहेत. या पाय वाटेने एक ते सव्वा तासात भैरवगड आणि घनचक्कर डोंगर यामधील खिंडीत येउन पोहोचतो. कातळात कोरलेल्या पायर्या चढुन आपण भैरवगड पठारावर येतो. गडावर मोठा पाणी साठा आहे. गडावर एकुण २३ टाके आहेत पण त्यातील २ ते ३ टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे. पावसाळ्यात सर्व पाणी टाके भरलेले असतात. काही टाक्याच्या बाजुला रांजण खळगे कोरलेत. गडावर काही ठिकणी विरगळी पाहायला मिळतात. कातळात खोदलेल्या पायर्या उतरुन कड्याच्या टोकावर कोरलेल्या भैरोबाच्या जोड गुहेत जाता येते. गुहेत भैवनाथाची अश्वारुढ मुर्ती आहे. तेथेच बाजुला असलेल्या गुहेत स्वयंपाकाची भांडी आणि चुल आहे आणि येथे मुक्काम करू शकतो. गुहेच्या कड्याकडील बाजुहुन शिरपुंजे गाव, घनचक्कर डोंगररांग दिसते.
भैरवगड म्हणजे पावसाळ्यात तर हिरव्यागार शालूनी आणि पांढऱ्या शुभ्र धबधब्यानी नटलेला असतो. असा हा ट्रेक करण्याची संकल्पना मी आमचे सोबती उमेश कडे मांडली अन तारीख ठरली बघता बघता चारच दिवसात आमची गाडी पण फुल झाली .पण पुन्हा तेच आमच्या वाटेला आलं ....करोना मूळ हरिश्चंद्रगड कळसुबाई अभयारण्य शनिवारी रविवारी बंद करण्यात आलं अन ट्रेक पुन्हा एकदा रद्द करावा लागला.पण सर्व जण उत्सुक असल्यामुळे त्यांचा हिरमोड हाऊ नये म्हणून सर्वांच्या सोयीने शुक्रवार 16 तारीख आम्ही जाहीर करून तयारी चालू केली.आणि तो दिवस उजेडला सकाळी 4.30वाजता आम्ही प्रवासासाठी सुरुवात करून आम्ही आमचा सह्याद्रीतील विश्वासू आमचा पाचनई चा मित्र प्रकाश कडे चहा नाश्ता साठी थांबलो त्याला सोबत घेऊन आम्ही भैरवगड कडे निघालो परंतू बऱ्याच वेळेस पावसाळी ट्रेक मध्ये येणारे अनुभव नेमका आज आमच्या वाटेला आला.ते म्हणजे अंबित गावाजवळ एक झाड पडलेलं आहे अशी कल्पना एका वाटसरू ने दिली म्हणून प्रकाश ने दुसऱ्या मार्गाने जाण्याचा पर्याय सांगितला त्या प्रमाणे आम्ही खडके मार्गे जाण्यास निघालो तो रस्ता मला देखील अपिरिचित च होता.पण प्रकाश ला तो माहीत होता पण तो एवढा दूर असेल वाटलं नाही .बराच वेळ प्रवास करून देखील पोहोचण्याचे काहीच चिन्ह दिसत नसताना ट्रेक मधील जवळ पास सर्वच मंडळी पहिल्यांदाच पावसाळी ट्रेक करत असल्या मूळ मनातून चिडचिड करू लागले ते देखील स्वाभाविकच आहे म्हणा पण आम्हाला ह्या पावसाळ्यात होणाऱ्या झाड पडणे,रस्ता खचने,पूल बंद असणे असे अनुभव असल्याने एकदा का पायथ्यापाशी पोहचलो ना मग सगळ्यांची चिडचीड कमी होईल याची अशा होती आणि झाले देखील तसेच पायथ्याला पोहचल्यावर निसर्गाने हलक्याश्या सरी आमच्या अंगावर पाडून क्षणार्धात आमचा थकवा दूर होत गेला.गड सर करताना नेहमी प्रमाणे प्रकाश पुढे अन सर्वात मागे मी थांबून कातळ्यातील काही पायऱ्या चढून आम्ही घनचक्कर आणि भैरवगड च्या खिंडीत पोहचलो अन तिथून पुढे तर अलगत अशी ढगांची चादर आमच्या अंगावर आली असा हा अनुभव बऱ्याच जणांनी पहिल्यांदाच अनुभवला असल्याने आपण ढगात असल्याचा फील त्यांच्या चेहऱ्यावर येत होता.शेवटचा टप्पा पार करून आम्ही गडावर पोहचलो.गडावरील सौंदर्य पाहून तर सर्वच निसर्गाच्या प्रेमात पडले त्यात ग्रुप मध्ये महिला असल्याने त्यांचा आवडता विषय म्हणजे फोटोग्राफी चा सर्वांनी मनमुराद फोटोसेशन करून अन भैरवनाथाचे दर्शन करून गड उतार करण्यास सुरुवात केली.खाली पोहचल्यावर जे पहिल्यांदाच असे निसर्गाच्या सानिध्यात आले होते त्यांच्या चेहऱ्यावरील भाव खूप काही सांगून जात होते.अन सर्वांनी ग्रुप फोटो घेऊन परतीचा प्रवास सुरु केला रस्त्यात अंबित धरणावर राहिलेल्या फोटोसेशन चा आनंद घेऊन आम्ही प्रकाश च्या घरी जेवणासाठी पोहचलो.प्रकाश ने पण सुंदर आशा पिठलं, भाकरी ,मटकी बटाट्याच्या स्वयंपाक करून सर्वांना खुश केलं.अन आम्ही सह्याद्रि च्या सुंदर आठवणींची शिदोरी घेऊन परतीचा प्रवास चालू केला.
ग्रुप मध्ये बरीच मंडळी नवखी असल्याने त्यांनी आमच्या वर जो विश्वास टाकून ट्रेक ला आले त्यांचे खरोखरच मनापासून धन्यवाद आणि तो विश्वास आम्ही आमच्या परीने पूर्ण करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला तरी ट्रेक मध्ये जर काही त्रुटी आढळल्यास क्षमस्व.
सर्वात शेवटी माझं नेहमीच सांगणं असत ...
महाराष्ट्र च्या भूमीत जन्माला यावे आणि किल्ले शिखर पाहू नये, हे होवूच शकत नाही. प्रत्येकाने आपल्या आयुष्यात दोन ते तीन महिन्यातून एकदातरी किमान वेळ काढून किल्ल्यावर जावून एका आगळ्यावेगळ्या नंदनवनात जावून येण्याचा अविस्मरणीय अनुभव घ्यावाच, नाहीतर आयुष्य व्यर्थच गेले असे समजा!! 🙏🏻🚩
सचिन भांड
sahyadritrekers.blogspot.com
सांधण vally full decend trek
Date- २०/२१ फेब.२०२१
सांधण दरी विषयी सांगायचं झाल्यास निसर्गाच्या कुशीत दडलेलं हे आश्चर्य आजही कित्येकांना माहित नाही. अहमदनगर जिलह्यातल्या सामरद या गावातून पुढे दीड ते दोन किमी अंतराने जाणारी ही दरी ट्रेकर्ससह इतर भटक्यांनाही मोहात पाडते. पावसाळ्याचे चार महिने वगळता वर्षभर पर्यटक इथे गर्दी करतात. सांधण दरी पूर्ण पहावयाचे झाल्यास दारीतील निमुळत्या खडकाळ वाटेवरून पुढे जात रात्री तिथेच मुक्काम करायचा हाच इथे आलेल्या अनेकांचा प्लॅन असतो. समोर आजोबा पर्वत, रतन गड आणि मागे अलंग-मदन-कुलंग गड आणि कळसुबाई शिखर सह्याद्रीच्या विशालतेची साक्ष देत असताना ही सांधण दरी सर करणं तुम्हाला त्या मानाने सोपं जरी वाटत असलं तरी ते खरं तर दरीत पूर्ण उतरल्यावळच कळत. आशिया खंडातील क्रमांक दोनची खोल दरी असा या दरीचा लौकीक असल्याचं सांगितलं जातं. म्हणूनच ती पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक गर्दी करतात. सांधण दरीला यायचं तर निदान दोन दिवस तरी काढायला हवेत. ही दरी पूर्ण पहावयाचे झाल्यास साहसी मोहीमा करतच पुढे जायचं असंच त्या साठी तुम्हाला rappling करतच या दरीमध्ये उतरून. पुढे जागोजागी रॅपलिंग, क्लाइंबिंग असे साहसी प्रकार करत तुम्ही पुढे सरकता. अर्थात, हे सगळे साहसी प्रकार तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच करायला हवेत.आणि रात्री दरीच्या शेवटच्या टोकापाशी रात्रीच्या लक्ख अंधारात जंगलाच्या सानिध्यात तंबू ठोकून दुसऱ्या दिवशी सकाळीच करोली घाट चढून परतीच्या प्रवासाला लागायचं अन गावात दुपारचं जेवण केलं की या दरीतल्या आठवणी घेऊन पुन्हा आपल्या घरी जायचं.
असा ह्या ट्रेक च नियोजन मी आणि माझे ट्रेकर मित्र उमेश,सुशांत, laxuman याना सोबत घेऊन नियोजन केल्यावर सुरवातीला 17 लोकांचं प्लॅन करता 26 लोकांचं झाल सुरवातीला ट्रेक विषयी पूर्ण कल्पना ग्रुप वर दिलीच होती सर्व जण आता अतुरतरने तो दिवस उजेडण्याची वाट पाहत होते आणि तो दिवस उजेडला सकाळी 4 वाजता आमची गाडी श्रीरामपूर वरून प्रस्थान करत वाटेत आमचे कोल्हार चे आणि देवळाली चे मित्र घेऊन आमचा प्रवस चालू झाला त्यातच रस्त्यात आमची गाडीचे tyre puncture झाले त्यात एक दीड तास गेला पण तेवढ्या वेळात आम्ही ह्या ट्रेक ला बरीचशी नवखी मंडळी असल्याने सर्वांची ओळख करून घेतली आमचा गाडीचा ड्राइवर फारच स्लो असल्याने आपल्याला आता निश्चितच ठरवलेल्या वेळेच्या पेक्षा आता उशीर होणार याची एव्हाना कल्पना मला आलीच होती असा हा प्रवास करत आम्ही साम्रद मधील माझा मित्र आनंदाच्या घरी 11 वाजता पोहचलो आणि थोडीही वेळ न दवडता नाश्ता आणि सोबत दुपारच्या जेवणासाठी भाजी भाकरी सोबत घेऊन लागलीच ट्रेक ला सुरवात केली सुरवातीलाच प्रचंड उत्साह असल्याने सर्व मंडळी फोटो काढत प्रवास करत होते सुरवातीच्या patch च्या ठिकाणी छाती एवढ्या पाण्याच्या डबक्यात आता ग्रील टाकल्याने ती वाट आता सोईस्कर झाली खरी पण पाण्यातून जाण्याचा थरार मात्र निघून गेला.अश्या ह्या खडकातून वाट काढत आम्ही पहिल्या rappling patch पाशी आलो यातील बरेच शी मंडळी पहिल्यांदाच rappling करताय ते पाहून अस किंचितसही वाटलं नाही सर्वांनीच सुरेख हा टप्पा पार केला खरा पण पुढे दिसणार प्रचंड खडकाळ वाट आपली शरीर क्षमता याचा आता कस लागणार याची एव्हाना सर्वानाच कल्पना आली होती पण आता आपण अश्या ठिकाणी आहोत तेथून मागे फिरणं तर दूरच होत त्या मूळ आहे त्या परिस्थितीत आता पुढे जावेच लागणार होते असे हे कठीण patch पूर्ण करत आम्ही आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहचलो आणि सर्वांनी आपापल्या तंबूत मुक्काम ठोकला थोडीशी विश्रांती जेवण करून जे ते दिवसभर पायपीट झाल्यामुळं झोपी गेले.
सकाळी सर्वांना लवकरच जाग आली पण सर्वांच्या आता मांड्या पाय जॅम झाल्या होत्या सर्वांच्या मनात एकाच शंका हाती आपलं आता हा डोंगर चढण होईल का नाही पण समोर कुठलाच पर्याय नव्हता सर्वांनी चहा आणि पोह्याचा नाश्ता करून लागलीच करोली घाटाचा डोंगर चढवयास सुरवात केली आमची बरीचशी मंडळी सप सप थोडं थांबत थोडं चालत डोंगर सर करत होती त्यातच आमचा एक मित्र थोडा थकल्याने त्याला सोबत घेऊनच आणि त्याचा कानोसा घेऊनच मी पण चालत होतो पण एका ठिकाणी त्याला आवाज दिला तरी त्याच्या कडून काहीच प्रतिसाद येत नव्हता म्हणून मी परत माघारी फिरलो तर महाशय मस्त कानात हेड फोन लावून गाणे ऐकत होते त्या नंतर त्याला पुढे घालूनच आम्ही आनंदाच्या घरी सर्वात शेवटी पोहोचलो तो पर्यंत बाकीचे मंडळी धरणाच्या पाण्यात डुबकी मारून जेवणास पण बसली होती.मंग आम्ही पण धरणात अंघोळ करून सुंदर पिठलं भाजी भाकरी वर ताव मारला .ह्या ट्रेक दरम्यान मनातून काहींनी मला शिव्या पण दिल्या असतील कुठं आणलं ह्या माणसानं पण जेव्हा ट्रेक पूर्ण झाला तेव्हा आता सर्वांच्या चेहऱ्यावर आता एक आत्मिक समाधान होत जे आयुष्यात आपण कधी विचारही केला नसता ते पूर्ण झाल्याचा.तसेच ह्या ट्रेक च वैशिष्ट्य म्हणजे बरीचशी मंडळी ही चाळीशी पार झालेली आणि विशेष कौतुक आमच्या कोहली काकांचा वयाच्या 70 रीत देखील तरुणांना लाजवेल असा हा ट्रेक त्यांनी सुंदर रित्या पूर्ण केला.
सर्व मंडळी ज्या विश्वासाने तुम्ही आमच्या सोबत आलात आणि आम्ही आमच्या परीने तो विश्वास पूर्ण कसरण्याचा प्रयत्न केला.तरी आमच्या कडून काही त्रुटी राहिल्या असतील तर नक्कीच पुढील ट्रेक ला त्या दुरुस्त होतील सर्वांचे पुनःश्च खूप खूप धन्यवाद
सचिन भांड
सह्याद्री ट्रेकर्स श्रीरामपूर
sahyadritrekers.blogspot.com
हरिश्चंद्रगड महिला विशेष ट्रेक..
१० जानेवारी २०२१.
सध्या च्या युगात पुरुषांच्या बरोबरीने सर्व जबाबदाऱ्या आत्मविश्वासाने हाताळणाऱ्या, दैनंदिन आयुष्यातील पेच प्रसंगांना थेट सामोऱ्या जाणाऱ्या आणि आता सामाजिक पातळ्यांवर लादण्यात येणारी बंधने धैर्याने बाजूला सारून श्रीरामपुर सारख्या ग्रामीण भागातील ही श्री 'शक्ती' १०जानेवारी.म्हणजेच दोनच दिवसा नंतर येणाऱ्या राजमाता जिजाऊ मासहेबांच्या जन्मदिनी.अश्या ह्या जिजाऊ च्या लेकी एकवटल्या त्या कोणत्याही परिस्थितीत सामोरे जाण्यास, त्याच्या विरोधात लढण्यास आम्ही सक्षम आहोत, मोकळेपणाने श्वास घ्या. अभिमानाने जगण्याची सुरुवात करा. आपनच आपल आरोग्याचा कसा सांभाळ करायचा असा हा संदेश देऊन या महिलांनी ट्रेक चा बिनधास्त मनमोकळेपणाने आनंद घेतला.
*श्रीरामपूर ते देवभूमी*: केदारनाथ, बद्रीनाथ, तुंगनाथ आणि* ऋषिकेशचा अंगावर काटा आणणारा प्रवास!* दिनांक 09 जून ते 19 जून 2026 ‘मनात भक्ती...