Wednesday, February 24, 2021

सांधण दरी ट्रेक







सांधण vally full decend trek

Date- २०/२१ फेब.२०२१


काही वर्षांपूर्वी एअर टेल च्या जाहिरातीने प्रकाश झोत्यात आलेली ही दरी ती जाहिरात पाहूनच खर तर तिच्या ऱ्हष्याच्या प्रेमात मी पडलेलो होतो आणि ती बघायची इच्छा लगेचच पूर्ण पण झाली त्या वेलेस ही पूर्ण दरी एकाच दिवसात आम्ही करोली घाट रात्रीच्या अंधारात चढून पूर्ण केली होती. अशी ही दरी करायची इच्छा आमच्या सह्याद्री च्या मित्रांनी माझ्या कडे केली आणि दोन दिवसाच नियोजन करून पूर्ण ट्रेक चा प्लॅन केला 

सांधण दरी विषयी सांगायचं झाल्यास निसर्गाच्या कुशीत दडलेलं हे आश्चर्य आजही कित्येकांना माहित नाही. अहमदनगर जिलह्यातल्या सामरद या गावातून पुढे दीड ते दोन किमी अंतराने जाणारी ही दरी ट्रेकर्ससह इतर भटक्यांनाही मोहात पाडते. पावसाळ्याचे चार महिने वगळता वर्षभर पर्यटक इथे गर्दी करतात. सांधण दरी पूर्ण पहावयाचे झाल्यास दारीतील निमुळत्या खडकाळ वाटेवरून पुढे जात रात्री तिथेच मुक्काम करायचा हाच इथे आलेल्या अनेकांचा प्लॅन असतो. समोर आजोबा पर्वत, रतन गड आणि मागे अलंग-मदन-कुलंग गड आणि कळसुबाई शिखर सह्याद्रीच्या विशालतेची साक्ष देत असताना ही सांधण दरी सर करणं तुम्हाला त्या मानाने सोपं जरी वाटत असलं तरी ते खरं तर दरीत पूर्ण उतरल्यावळच कळत. आशिया खंडातील क्रमांक दोनची खोल दरी असा या दरीचा लौकीक असल्याचं सांगितलं जातं. म्हणूनच ती पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक गर्दी करतात. सांधण दरीला यायचं तर निदान दोन दिवस तरी काढायला हवेत. ही दरी पूर्ण पहावयाचे झाल्यास साहसी मोहीमा करतच पुढे जायचं असंच  त्या साठी तुम्हाला rappling करतच या दरीमध्ये उतरून. पुढे जागोजागी रॅपलिंग, क्लाइंबिंग असे साहसी प्रकार करत तुम्ही पुढे सरकता. अर्थात, हे सगळे साहसी प्रकार तज्‍ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच करायला हवेत.आणि रात्री दरीच्या शेवटच्या टोकापाशी रात्रीच्या लक्ख अंधारात जंगलाच्या सानिध्यात तंबू ठोकून दुसऱ्या दिवशी सकाळीच करोली घाट चढून परतीच्या प्रवासाला लागायचं अन गावात दुपारचं जेवण केलं की या दरीतल्या आठवणी घेऊन पुन्हा आपल्या घरी जायचं.

असा ह्या ट्रेक च नियोजन मी आणि माझे ट्रेकर मित्र उमेश,सुशांत, laxuman याना सोबत घेऊन नियोजन केल्यावर सुरवातीला 17 लोकांचं प्लॅन करता 26 लोकांचं झाल सुरवातीला ट्रेक विषयी पूर्ण कल्पना ग्रुप वर दिलीच होती सर्व जण आता अतुरतरने तो दिवस उजेडण्याची वाट पाहत होते आणि तो दिवस उजेडला सकाळी 4 वाजता आमची गाडी श्रीरामपूर वरून प्रस्थान करत वाटेत आमचे कोल्हार चे आणि देवळाली चे मित्र घेऊन आमचा प्रवस चालू झाला त्यातच रस्त्यात आमची गाडीचे tyre puncture झाले त्यात एक दीड तास गेला पण तेवढ्या वेळात आम्ही ह्या ट्रेक ला बरीचशी नवखी मंडळी असल्याने सर्वांची ओळख करून घेतली  आमचा गाडीचा ड्राइवर फारच स्लो असल्याने आपल्याला आता निश्चितच ठरवलेल्या वेळेच्या पेक्षा आता उशीर होणार याची एव्हाना कल्पना मला आलीच होती असा हा प्रवास करत आम्ही साम्रद मधील माझा मित्र आनंदाच्या घरी 11 वाजता पोहचलो आणि थोडीही वेळ न दवडता नाश्ता आणि सोबत दुपारच्या जेवणासाठी भाजी भाकरी सोबत घेऊन लागलीच ट्रेक ला सुरवात केली सुरवातीलाच प्रचंड उत्साह असल्याने सर्व मंडळी फोटो काढत प्रवास करत होते सुरवातीच्या patch च्या ठिकाणी छाती एवढ्या पाण्याच्या डबक्यात आता ग्रील टाकल्याने ती वाट आता सोईस्कर झाली खरी पण पाण्यातून जाण्याचा थरार मात्र निघून गेला.अश्या ह्या खडकातून वाट काढत आम्ही पहिल्या rappling patch पाशी आलो यातील बरेच शी मंडळी पहिल्यांदाच rappling करताय ते पाहून अस किंचितसही वाटलं नाही सर्वांनीच सुरेख हा टप्पा पार केला खरा पण पुढे दिसणार प्रचंड खडकाळ वाट आपली शरीर क्षमता याचा आता कस लागणार याची एव्हाना सर्वानाच कल्पना आली होती पण आता आपण अश्या ठिकाणी आहोत तेथून मागे फिरणं तर दूरच होत त्या मूळ आहे त्या परिस्थितीत आता पुढे जावेच लागणार होते असे हे कठीण patch पूर्ण करत आम्ही आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहचलो आणि सर्वांनी आपापल्या तंबूत मुक्काम ठोकला थोडीशी विश्रांती  जेवण करून जे ते दिवसभर पायपीट झाल्यामुळं झोपी गेले.

सकाळी सर्वांना लवकरच जाग आली पण सर्वांच्या आता मांड्या पाय जॅम झाल्या होत्या सर्वांच्या मनात एकाच शंका हाती आपलं आता हा डोंगर चढण होईल का नाही पण समोर कुठलाच पर्याय नव्हता   सर्वांनी  चहा आणि पोह्याचा नाश्ता करून लागलीच करोली घाटाचा डोंगर चढवयास सुरवात केली आमची बरीचशी मंडळी सप सप थोडं थांबत थोडं चालत डोंगर सर करत होती त्यातच आमचा एक  मित्र थोडा थकल्याने त्याला सोबत घेऊनच आणि त्याचा कानोसा घेऊनच मी पण चालत होतो पण एका ठिकाणी त्याला आवाज दिला तरी त्याच्या कडून काहीच प्रतिसाद येत नव्हता म्हणून मी परत माघारी फिरलो तर महाशय मस्त कानात हेड फोन लावून गाणे ऐकत होते त्या नंतर त्याला पुढे घालूनच आम्ही आनंदाच्या घरी सर्वात शेवटी  पोहोचलो तो पर्यंत बाकीचे मंडळी धरणाच्या पाण्यात डुबकी मारून जेवणास पण बसली होती.मंग आम्ही पण धरणात अंघोळ करून सुंदर पिठलं भाजी भाकरी वर ताव मारला .ह्या ट्रेक दरम्यान मनातून काहींनी मला शिव्या पण दिल्या असतील कुठं आणलं ह्या माणसानं पण जेव्हा ट्रेक पूर्ण झाला तेव्हा आता सर्वांच्या चेहऱ्यावर आता एक आत्मिक समाधान होत जे आयुष्यात आपण कधी विचारही केला नसता ते पूर्ण झाल्याचा.तसेच ह्या ट्रेक च वैशिष्ट्य म्हणजे बरीचशी मंडळी ही चाळीशी पार झालेली आणि विशेष कौतुक आमच्या कोहली काकांचा वयाच्या 70 रीत देखील तरुणांना लाजवेल असा हा ट्रेक त्यांनी सुंदर रित्या पूर्ण केला.

सर्व मंडळी ज्या विश्वासाने तुम्ही आमच्या सोबत आलात आणि आम्ही आमच्या परीने तो विश्वास  पूर्ण कसरण्याचा प्रयत्न केला.तरी आमच्या कडून काही त्रुटी राहिल्या असतील तर नक्कीच पुढील ट्रेक ला त्या दुरुस्त होतील सर्वांचे पुनःश्च खूप खूप धन्यवाद

सचिन भांड

सह्याद्री ट्रेकर्स श्रीरामपूर

sahyadritrekers.blogspot.com





3 comments:

  1. ट्रेक खडतर होता पन खुपच मज्जा आली

    ReplyDelete
  2. ट्रेक खडतर होता पण संपूर्णपणे त्याचा सर्वांनी आनंद लुटला

    ReplyDelete

देवभूमी यात्रा

  ​ *श्रीरामपूर ते देवभूमी*: केदारनाथ, बद्रीनाथ, तुंगनाथ आणि* ऋषिकेशचा अंगावर काटा आणणारा प्रवास!* दिनांक 09 जून ते 19 जून 2026 ​‘मनात भक्ती...