महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजीमहाराजांचा जन्मदिन....जवळपास पावणेचारशे वर्षांपूर्वी सह्यपर्वतावर एक निश्चयाचा महामेरू अवतरला, तो युगपुरूष हातातली भवानी तलवार उपसत उच्चारता झाला, "ये राज्य व्हावें, ही तो श्रींची इच्छा !" शिवरायांचे नाव घेतल्याखेरीज आमचा दिवसही जात नाही. मग शिवजयंती,तिची तारीख- वार-तिथी तर औपचारिकता ठरते.
शिवजयंती साजरी करायची म्हणजे आज आम्ही महाराजांच्या तसबिरीला, मूर्तीला किंवा पुतळ्याला हार वाहतो. मोठमोठ्याने घोषणा देतो. याहीपुढे जाऊन कोणी उत्साही लोक हातात भगवे घेऊन गावभर फिरत राहतील. डिजे लावून नाचणाऱ्यांच्या विकृतीवर मात्र त्वरीत उपचार होणं गरजेचे आहे.; पण मला प्रश्न असा पडतो, की शिवचरित्राची पोच खरंच आज किती भारतीयांना आहे ?
खरं तर माझा प्रश्नच चुकला ! भारतीय म्हणण्याआधी फक्त महाराष्ट्राचा विचार करायला हवा. ज्या युगपुरूषाची नोंद तत्कालिन जागतिक राजकारणात घेण्यात आली, आज भारतभर त्याची धड ओळखही नाही. आपला इतिहास आपल्यालाच माहीत नाही यापेक्षा दुसरे आपल्या कर्मदरिद्रीपणाचे कुठले लक्षण सांगणार? हे एवढं या ठिकाणी सांगावेसे वाटते याला कारण म्हणजे काल परवा असच एका शाळे मध्ये शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून जाण्याचा योग आला तिथे मुलांना काही महाराजां च्या विषय अगदी सोपे प्रश्न विचारले पण त्यांची उत्तरे ऐकून तर अगदी अवाक च झालो पण त्यात त्या निरागस मुलांची काही चूक नाही म्हणा याला एकमेव कारन म्हणजे दिवसेंदिवस इतिहास च्या पुस्तकातून एक एक पान कमी होत जाण अहो इतकच काय पण आपला इतिहास जो काही समजतो तो या गड किल्यांच्या मधून च पण आज काल ह्या मुलांना शाळा घेऊन जाते ती so called picnic स्पॉट ला अहो पण तिथे तुम्ही तुमची फॅमिली पण घेऊन जाऊ शकता ना एक काळ असा होता की सहल म्हंटल की ती फक्त गड किल्ले वर असायची इतकेच काय लहान मुले तर सोडाच पण जेव्हा आम्ही असे गड किल्यावर जातो तिथल्या प्रत्येक वास्तू ला तिथल्या शैलीला एक विशिष्ट प्रकारचे नाव असतात ती वास्तू तिथेच का अशीच का त्या मागची अनेक कारण असतात हे आपण जाणून घेतो का म्हणून च खर तर या शिवजयंती ला हे सर्व विस्तृत पणे मला आपणा समोर मांडायचे होते पण वेळेअभावी ते मांडता नाही आले कारण अस वाटायला नको आपण नुसतेच किल्ले सर करतो फोटो काढतो अन झाला आमचा गड पूर्ण असो परत कधीतरी तो योग् येईलच पण ती कमी आपल्या दोन छोट्या शिवकण्न्या यांनी महाराजांचे विचार आणि ते विचार आज आपण किती अमलात आणतो हे सांगताना खर तर अंगावर अक्षरशः शहारे येत होते.त्यात च योगायोगाने माझ्या आयुष्यात दोन व्यक्ती अशा आहेत त्यातील पहिली म्हणजे माझ्या जडणघडणी मध्ये जीचे अमूल्य स्थान आहे त्या आमच्या मातोश्री आणि दुसरे म्हणजे महाराज आज त्यांच्याच जयंती निमित्त मातोश्री ची आपल्या परिवाराची भेट व्हावी या सारखा माझ्यासाठी दुर्मिळ योग् कुठला नसावा तिच्या बद्दल किती ही लिहिले तरी कमीच आहे तिचा अध्यात्मिक अभ्यास किती आहे तिच्या वाणीतून आपणा समोर आलाच असेल. त्यातच महाडिक कुटुंबांचे आदरातिथ्य म्हणजे आपल्या घरात पण कुणी करणार नाही इतके ते करतात.
मराठ्यांचे हे स्वराज्य ही केवळ शिवरायांची वैयक्तिक महत्वकांक्षा नव्हती; ते स्वराज्य होते, रयतेचे राज्य होते. धर्मवेड्या औरंगजेबाकडे ही समज नव्हती. शिवरायांनी माणसं जोडून स्वराज्याचे शिलेदार घडवले; कपटी औरंगजेब स्वतःपासून माणसं तोडत राहिला आणि मोगल सत्तेच्या नाशास कारणीभूत ठरला. शिवशाहीची हीच पोच महाराष्ट्राच्या पुढच्या पिढ्यांमध्ये राहिली नाही आणि आपण आपले स्वराज्य गमावून बसलो.म्हणूनच आपण हे गड किल्ले फिरत च राहू अशीच आपल्यासारखी माणसे जोडत राहू पण त्याच बरोबर असे कार्यक्रम घेऊन आज आपली छोटी मुले रुद्रा,ओम,वेदांत आज पुढे येऊन काहितरी बोलू लागलीत ही एक आपल्यासाठी अभिमानाची बाब आहेच असेच नवीन पिढी साठी नक्कीच आपले हे प्रयत्न प्रेरणादायी घडावे इतकीच अपेक्षा.
पुनःस्च एकदा आपण सर्व जण आवर्जून ह्या शिवजयंती उत्सवात हजर राहिलात त्या बद्दल सह्याद्रि परिवाराच्या वतीने आभार मानतो.
सचिन भांड
सह्याद्रि ट्रेकर्स परिवार

No comments:
Post a Comment