डोंगरांनो का उभे? सांगाल का काही मला?
तीनशे वर्षांचिया जो मागला तो मामला
कुणी फिरस्ता हिंडता वनी,
वदला ऐशी आर्जववाणी ।
ऐकून त्याची आर्त याचना,
आली येथल्या जडा चेतना।।
मला विचारा मीच सांगतो,
आधी या माझ्याकडे, सरसावत एकेक पुढे,
हात उभारूनि घुमू लागले, डोंगर किल्ले बुरूज कडे ।।
कवी यशवंत यांनी सहय़ाद्रीच्या अंगाखांद्यावर उभ्या असलेल्या गडकोटांबद्दल लिहून ठेवलेले हे सुंदर काव्य. गडकोटांमध्ये रमणाऱ्यांना ते अनेकदा आत्मगानच वाटते. या काव्याचे स्मरण होण्याचे कारण म्हणजे दिवाळी आलीय आणि दिवाळी म्हटले की आपल्या सर्वांना आता ओढ लागते ती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची! दिवाळी म्हटले की, जसे फराळ, फटाके, पणत्या, आकाशकंदील डोळय़ांपुढे येतात, तसेच अंगणातील किल्लाही आठवतो. लहानांच्या विश्वातला आणि मोठय़ांच्या आठवणीतला असा हा दिवाळीचा किल्ला!
खर तर लहान असताना मी कधी ही किल्ला बनवला नाही कारण आपल्या भागात पुणे मुंबईच्या मानाने ही प्रथा फारशी परिचित नव्हती त्यातच त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज समजले ते फक्त शाळेतली पुस्तकांच्या पुरतेच पण पुण्यात असताना आमच्या ग्रुप ने जेंव्हा किल्ले बनवा स्पर्धा आयोजित केली तेंव्हा खर तर कळले की किल्ले दिवाळी मध्येच का बनवतात. तेंव्हा खर तर त्या लहान मुलांचा अगदी त्या सिमेंट च्या जंगलात देखील ज्या पद्धतीने ती मूल त्या मातीत रममाण होत होती आपला इतिहास जपत होती ते पाहून आपण ते बालपण जगण्यापासून किती वंचित राहिलो हे जाणवले आणि एकीकडे आपल्याकडे सगळी मुबलकता असून देखील या संस्कृती पासून बऱ्यापैकी आपली मुल ही अपरिचितच आहे.खर तर या किल्ले बनवण्यासाठी लागणाऱ्या माती पासूनच आपला इतिहास ही लहान मुले शिकायला लागतात आणि त्याच मुळे कदाचित आज ही आपण बघतो आपले ट्रेकिंग क्षेत्र असो अथवा इतिहास अभ्यासक असो ते ही या शहरी भागातून बघावयास मिळते असे मला वाटते.
म्हणूनच जेंव्हा पासून आपल्या गावी आलो आणि आपला हा परिवार उभा राहिला तेंव्हा पासूनच ही संकल्पना मनात घर करून उभी होती . ही संकल्पना मागील वर्षी माझ्या सहकाऱ्यांच्या समोर मांडली कारण अशा प्रकारची स्पर्धा भरवणारे सह्याद्रि ट्रेकर्स हा आपला पहिलाच श्रीरामपूर मधील ग्रुप होता आणि बघता बघता पहिल्याच वर्षी श्रीरामपूर च्या या छोट्या मावळ्यांचा इतका उत्साह होता की पहिल्या च वर्षी पन्नाशी च्या आसपास छोट्या मावळयानी सहभाग नोंदवून आपला हा वैभवशाली इतिहास अनुभवला.
आता हे किल्ले का बनवायचे आणि दिवाळीतच का बनवायचे हे देखील जाऊन घेणे तितकेच महत्त्वाचे .
शिवाजी महाराजांनी किल्ल्यांच्या सहाय्याने स्वराज्य उभे केले आणि तमाम महाराष्ट्राला दिवाळी साजरी करता येऊ लागली कारण तो पर्यंत कायम पारतंत्र्यात राहिलेले आपले पूर्वज कधी कोरडा दुष्काळ तर कधी ओला दुष्काळ त्यातच अमानुष अत्याचार त्या मुळे कुठली दिवाळी न कुठला दसरा पण महाराजांनी जेव्हा स्वराज्य निर्माण केले तेंव्हाच खऱ्या अर्थाने दिवाळी सण हा साजरा होऊ लागला .त्यातच आपल्या महाराष्ट्रातील किल्ले, गड यांना अगदी पूर्वीच्या काळापासून अनन्यसाधारण महत्व आहे. आपले किल्ले हे पूर्वजांच्या पराक्रमाची आणि गौरवशाली इतिहासाची साक्ष देतात. दिवाळीत किल्ले बनविण्याची परंपरा हि त्याच्याशीच निगडित आहे. आपल्या लहानग्यांना ह्याच इतिहासाची आणि पराक्रमाची माहिती व्हावी तसेच त्यांना त्याची गोडी लागावी हा एक उद्देश दिसून येतो.म्हणूनच कदाचित हा सण साजरा करताना महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याची आठवण म्हणुन दिवाळीत किल्ला करण्याची प्रथा चालू झाली असावी.
असो, या निमित्ताने का होईना लोक किल्ल्यांची आठवण ठेवायला लागले आणि आपल्या लहानग्या सोबत आपणही इतिहास ह्या किल्ल्यांचा रूपाने का होईना अनुभवू लागले हे काय कमी आहे का .
.jpeg)
No comments:
Post a Comment